Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Arya Encounter: मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू

Rohit Arya Encounter: मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू

Rohit Arya Encounter: मुंबईतील पवई परिसरातील आर ए स्टुडिओत गुरुवारी दुपारी घडलेल्या थरारक ओलीस प्रकरणात अखेर पोलिसांनी यश मिळवले. १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवणारा मानसिकदृष्ट्या अस्थिर आरोपी रोहित आर्य याला पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळी लागली. तसेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरोपीकडे एअर गन आणि रसायने

पोलीस बाथरूममधून आत घुसले तेव्हा आरोपीकडे एअर गन आणि काही रसायनांच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले, परंतु त्याने नकार दिल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जखमी अवस्थेत त्याला जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा –धक्कादायक! मुंबईत ऑडिशनच्या बहाण्याने माथेफिरुने मुलांना ओलीस ठेवलं; नेमकं काय घडलं? वाचा

मुलांना सुरक्षितरीत्या वाचवले

डीसीपी दत्ता किशन नलावडे यांनी सांगितले की, दुपारी १:४५ वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने विविध पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी क्यूआरटी आणि विशेष दल उपस्थित होते.

ऑडिशनच्या नावाखाली फसवणूक

तपासात उघड झाले की, आरोपीने मुलांना वेब सिरीजसाठी ऑडिशन असल्याचे सांगून स्टुडिओत बोलावले होते आणि त्यानंतर त्यांना ओलीस ठेवले. ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांचे वय ४ ते ५ वर्षे इतके लहान होते, ज्यामुळे कारवाई अत्यंत संवेदनशील ठरली.

आरोपीचा व्हिडिओ समोर आला

घटनेपूर्वी आरोपीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यात त्याने आर्थिक किंवा राजकीय मागण्या नसून काही लोकांशी ‘नैतिक आणि वैचारिक मुद्द्यांवर’ बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिस आता त्याच्या पार्श्वभूमीचा आणि मानसिक स्थितीचा सखोल तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!