Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रोहित पवार औरंगजेबासारखा, नेता होण्याच्या भानगडीत आमदारकी घालवशील, गोपीचंद पडळकरांचा तिखट पलटवार

रोहित पवार औरंगजेबासारखा, नेता होण्याच्या भानगडीत आमदारकी घालवशील, गोपीचंद पडळकरांचा तिखट पलटवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा तापले आहे. सांगलीतील वाळवा येथील एका कार्यक्रमात रोहित पवार यांनी पडळकरांना “डुप्लिकेट सोने” आणि “बेन्टेक्स” म्हणत टोला लगावला होता. यावर पडळकरांनी कोल्हापुरात जोरदार पलटवार करत रोहित पवारांना “औरंगजेबासारखा” संबोधले आणि अजित पवार यांच्या मुलाबाबत चिंता व्यक्त केली. या शाब्दिक चकमकीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.

गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर तिखट टीका करताना म्हटले, “डुप्लिकेटपणा हा पवार कुटुंबात ठासून भरलेला आहे. रोहित पवार हा आपल्या आजोबांवर (शरद पवार) गेलाय. गेली 50 वर्षे त्यांनी पितळ सोने म्हणून विकले. रोहितमध्येही हाच डुप्लिकेटपणा आहे.” पडळकरांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात रोहित पवार यांना “पोस्टल मतांवर निवडून आला” असा टोला लगावला होता, ज्याचा आधार घेत पडळकरांनी रोहित यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पडळकरांनी रोहित पवारांना “औरंगजेबासारखा” संबोधत गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावाचा घात केला. मला अजित पवारांच्या मुलाची (पार्थ पवार) चिंता वाटते. रोहित पवार त्याच्याशीही असेच काही करेल, असा मला संशय आहे.” पडळकरांनी अजित पवारांना टिकून राहण्याचे श्रेय देताना म्हटले की, “अजित पवार त्यांना पुरून उरले, पण त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी लागेल.”

रोहित पवारांना खुलं आव्हान

पडळकरांनी रोहित पवार यांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “रोहित पवारांनी आपला कर्जत-जामखेड मतदारसंघ शाबूत ठेवावा. पोस्टल मतांवर निवडून आलाय, हे विसरू नये. उद्या तिथूनही तो निवडून येणार नाही. मी त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने काम करेन.” त्यांनी रोहित यांच्या “महाराष्ट्राचा नेता” होण्याच्या महत्त्वाकांक्षेवरही टिप्पणी केली, “महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीत स्वतःची आमदारकी घालवून बसशील. मीडियात बातम्या येणं म्हणजे सरकारच्या नाकात दम आणणं नव्हे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला हा बाळ गावात कधी जाणार?” असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!