Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ, महिला प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? तटकरे-विखेंनी घेतली फडणवीसांची भेट

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ, महिला प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? तटकरे-विखेंनी घेतली फडणवीसांची भेट

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांच्या आरोपामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यापुढील अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, पक्षांतर्गत विरोधाची धार तीव्र झाली आहे.

तटकरे-विखे ‘वर्षा’ बंगल्यावर
चाकणकरांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, तटकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत चाकणकरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्येच या विषयावरून दोन तट पडले असून, त्यांच्या हकालपट्टीसाठी एक गट आग्रही आहे.

नाशिकमधून बंडाचे निशाण
चाकणकर यांच्याविरोधात नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमधील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी त्यांच्या केवळ पदावरूनच नव्हे, तर पक्षातूनच हकालपट्टीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पक्षातीलच एखाद्या बड्या नेत्याचा पाठिंबा असल्याशिवाय हे पदाधिकारी इतकी मोठी मागणी करू शकत नाहीत, असा तर्क लावला जात आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांचा थेट हल्ला
या वादात आता रुपाली पाटील ठोंबरे यांनीही उडी घेतली आहे. “राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाहीत आणि चाकणकरांच्या प्रकरणामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठोंबरे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन महिला कार्यकर्त्यांचा संताप त्यांच्यासमोर मांडणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!