Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राफेलच्या वेगाने फाईल हलली! मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

राफेलच्या वेगाने फाईल हलली! मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

BJP Maharashtra State Headquarter: मुंबईच्या चर्चगेट परिसरात आज भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र या भूमिपूजनाआधीच शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, मरीन ड्राईव्हसमोर भाजपचे नवीन कार्यालय उभे राहते आहे, आणि त्याचे भूमिपूजन स्वतः अमित शाह करत आहेत. पण याच परिसरात मराठी भाषा भवनाचं काम वर्षानुवर्षं प्रलंबित आहे. भाजपचे दिल्लीतील मुख्यालय व्हाईट हाऊसलाही मागे टाकेल, पण मुंबईत मराठी भाषा भवनासाठी मात्र फाईल हलत नाही. भाजपच्या भूमिपूजनासाठी मात्र फाईल्स राफेलच्या वेगाने हलल्या.

हेही वाचा – Sanjay Raut : महापालिका निवडणुकीनंतर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

राऊत यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजूनही सुरू झालेले नाही, मात्र भाजपच्या पंचतारांकित मुख्यालयाचे उद्घाटन झपाट्याने होत आहे. अमित शाह प्रामाणिक माणूस आहेत. पण त्यांनी एकदा कुदळ मारली की या जमिनीमागचे सगळे रहस्य बाहेर येईल, असा टोला त्यांनी लगावला.

राऊतांचे अमित शाहांना पत्र

संजय राऊत यांनी अमित शाहांना या प्रकरणाबाबत सविस्तर पत्रही पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आरोप केला आहे की, मरीन लाईन्सजवळील ही जागा भाजपने सत्तेचा आणि नियमांचा गैरवापर करून ताब्यात घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा मूळतः महापालिकेच्या निवासी उद्देशासाठी राखीव होती, परंतु फक्त 11 दिवसांत फाईल्स मंजूर करून ती भाजपच्या खात्यात जमा करण्यात आली. राऊतांच्या पत्रानुसार भूखंडातील 46 टक्के हिस्सा बँकांकडे गहाण ठेवण्यात आला होता. उर्वरित 54 टक्के भाग एकनाथ रिअल्टर्सने लीजवर घेतला आणि पुढे भाजपला हस्तांतरित केला. केवळ दोन महिन्यांच्या आत सर्व परवानग्या मिळवून 21 कोटी 25 लाख रुपयांत व्यवहार पूर्ण झाला. भाजपने त्यावर 8 कोटी 91 लाख रुपये शुल्क भरले आणि 31 मे 2025 रोजी हक्काचे हस्तांतरणही पूर्ण झाले. राऊतांच्या मते, एवढ्या वेगाने फाईल्स हलणे हे संशयास्पद असून, या संपूर्ण व्यवहाराची चौकशी गृहमंत्र्यांनी स्वतः करावी.

भूमिपूजन कार्यक्रम आज सायंकाळी

भाजपचे हे नवीन प्रदेश मुख्यालय मरीन ड्राईव्हजवळील निर्मला निकेतन परिसरात उभे राहणार आहे. अत्याधुनिक सुविधा, बैठकींसाठी स्वतंत्र कक्ष आणि प्रशासकीय कार्यालयांसह हे कार्यालय महाराष्ट्रातील भाजप संघटनेचे नवे केंद्र ठरणार आहे. मात्र, भूमिपूजनाच्या आधीच उठलेल्या या आरोपांमुळे आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!