Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mayor Election : राज्यात ‘कमळ’ फुललं, पण चर्चा मात्र बिनविरोध निवडीची! 8 शहरांना मिळाले नवे कारभारी; पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Mayor Election : राज्यात ‘कमळ’ फुललं, पण चर्चा मात्र बिनविरोध निवडीची! 8 शहरांना मिळाले नवे कारभारी; पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Mayor List 2026 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला. राज्यातील ८ प्रमुख महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपने मुसंडी मारली असून, बहुतांश शहरांवर महायुतीचा भगवा आणि कमळ फडकल आहे. विशेष म्हणजे, अनेक शहरांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि ‘बिनविरोध’ पार पडली, ज्यामुळे राजकीय सलोख्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्यातील ८ शहरांमधील नव्या महापौरांची यादी:

  • सोलापूर: भाजपचे विनायक कोंड्याल यांची सोलापूरच्या महापौरपदी निवड झाली आहे. प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने हा विजय बिनविरोध ठरला.
  • जळगाव: जळगावमध्ये भाजपच्या दीपमाला काळे १७ व्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत, तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची वर्णी लागली आहे.
  • नागपूर: उपराजधानीत भाजपच्या नीता ठाकरे यांनी काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव करत महापौरपद आपल्याकडे राखले.
  • नाशिक: नाशिकमध्ये महायुतीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला असून, भाजपच्या हीमगौरी आडके महापौर तर शिंदे गटाचे विलास शिंदे उपमहापौर बनले आहेत.
  • नांदेड: नांदेडमध्ये भाजपने नवा इतिहास रचला असून कविता मुळे या शहराच्या पहिल्या भाजप महापौर ठरल्या आहेत.
  • धुळे: धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी तिरंगी लढतीत बाजी मारली आहे.
  • अहिल्यानगर (अहमदनगर): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या युतीने येथे सत्ता स्थापन केली असून ज्योती गाडे महापौर तर धनंजय जाधव उपमहापौर झाले आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर: येथे भाजपचे समीर राजूरकर महापौरपदी विराजमान झाले आहेत, तर उपमहापौर म्हणून शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी सूत्रे स्वीकारली आहेत.
  • पिंपरी-चिंचवड: औद्योगिक नगरीत भाजपचे रवी लांडगे महापौर तर शर्मिला बाबर उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचा – PCMC Mayor: पिंपरी-चिंचवडवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; रवी लांडगे यांची महापौरपदी तर शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड

नव्या महापौरांचा ‘विकास संकल्प’
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनियुक्त महापौरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहरांमधील रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रलंबित प्रशासकीय कामे मार्गी लावणे, हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या या वर्चस्वामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!