Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vaibhav Suryavanshi: सामना हरल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला वैभव सूर्यवंशी; पाहा ईडन गार्डन्सवरील हृदयस्पर्शी व्हिडिओ

Vaibhav Suryavanshi: सामना हरल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला वैभव सूर्यवंशी; पाहा ईडन गार्डन्सवरील हृदयस्पर्शी व्हिडिओ

Vaibhav Suryavanshi Crying Video: आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना श्वास रोखून धरायला लावणारा ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारात राजस्थानचा पराभव झाला, पण या पराभवापेक्षा जास्त चर्चा रंगली ती राजस्थानच्या १५ वर्षीय उदयोन्मुख खेळाडूची, म्हणजेच वैभव सूर्यवंशीची. सामना गमावल्यानंतर वैभवला आपले दुःख आवरता आले नाही आणि तो मैदानातच रडू लागला.

मैदानातच ओक्साबोक्शी रडला वैभव; व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या वैभवचा एक १६ सेकंदांचा हृदयद्रावक व्हिडिओ वेगाने पसरत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, ३ क्रमांकाची जर्सी घातलेला हा युवा फलंदाज पराभवामुळे पूर्णपणे खचून गेला आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकलो नाही, या भावनेने त्याने टोपीने चेहरा झाकून घेतला आणि तो मैदानावरच बसून रडू लागला. याच वेळी ‘केकेआर’च्या एका खेळाडूने त्याच्याकडे धाव घेत त्याला सावरले आणि त्याचे सांत्वन केले, ज्याने क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत.

कोलकाताचा अशक्यप्राय विजय आणि रिंकूचा ‘रुद्र’ अवतार
ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत १५६ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची अवस्था ८५ धावांवर ६ बाद अशी बिकट झाली होती. मात्र, इथूनच ‘फिनिशर’ रिंकू सिंगने सामन्याचा ताबा घेतला. रिंकूने नाबाद ५३ धावांची वादळी खेळी केली. यात ५ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. शेवटच्या ६ चेंडूंवर विजयासाठी ९ धावा हव्या होत्या. रिंकूने सुरुवातीलाच दोन चौकार खेचत दबाव झुगारला आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारून राजस्थानच्या तोंडचा घास हिरावून घेतला.

सामन्याचा सारांश: आशा अन् निराशा
राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली होती, मात्र अनुकूल रॉय आणि रिंकू सिंग यांच्यातील भागीदारी राजस्थानला महाग पडली. विजयाच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभव स्वीकारावा लागल्याने वैभव सूर्यवंशीसह राजस्थानच्या सर्वच खेळाडूंचा मोठा हिरमोड झाला. एका बाजूला कोलकाताच्या विजयाचा जल्लोष होता, तर दुसऱ्या बाजूला १५ वर्षांच्या वैभवच्या डोळ्यांतील अश्रूंनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!