Today बुधवार, 14th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची भरारी; नामांकित ‘GE Aerospace’ मध्ये 4 विद्यार्थ्यांची निवड

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची भरारी; नामांकित ‘GE Aerospace’ मध्ये 4 विद्यार्थ्यांची निवड

इंदापूर: विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमधील यांत्रिकी (Mechanical) विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी ‘GE Aerospace’ (चाकण, पुणे) मध्ये स्थान मिळवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस प्लेसमेंट मोहिमेत या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत बहुराष्ट्रीय कंपनीत आपली निवड निश्चित केली. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

निवड प्रक्रिया आणि वार्षिक विद्यावेतन
ही संपूर्ण कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया 12 जानेवारी 2026 रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यामध्ये सुरुवातीला 31 विद्यार्थ्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट दिली होती, त्यापैकी 7 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले. तांत्रिक आणि एचआर अशा दोन्ही फेऱ्यांनंतर अंतिमरित्या 4 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना 2.50 लाख रुपये इतके वार्षिक विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे. मुलाखत प्रक्रियेसाठी ‘GE Aerospace’ कडून असिस्टंट मॅनेजर महेश वांडेकर आणि कॅम्पस रिक्रूटर ईशिता बिस्वास यांनी पॅनेल म्हणून काम पाहिले.

यशस्वी विद्यार्थी आणि गौरव
‘GE Aerospace’ मध्ये निवड झालेल्या भाग्यवान विद्यार्थ्यांमध्ये गोरे पृथ्वीराज संतोष, निंबाळकर आदित्य मदनसिंह, शिंदे प्रतीक हनुमंत आणि भगत गीतांजली तुकाराम यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले की, “कठोर परिश्रम आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.”

प्रशिक्षण विभागाचे मार्गदर्शन आणि सहकार्य
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे मोठे योगदान आहे. या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी प्लेसमेंट अधिकारी प्रा. योगेश जाधव, यांत्रिकी विभागप्रमुख प्रा. दिनेश सावंत तसेच प्रा. बिपीन मालवे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालय परिवाराकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!