Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Delhi Terror Attack : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाचे धागेदोरे थेट पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’शी (JeM) जुळले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या खुलाशामुळे सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर ऐरणीवर आला असून पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड झाला आहे.

UN च्या ३७ व्या अहवालातील धक्कादायक खुलासे:

लाल किल्ल्यावरील ज्या हल्ल्यात १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्याची जबाबदारी खुद्द जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. जैश आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटना आता अस्तित्वात नसल्याचा दावा पाकिस्तान सातत्याने करत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालाने पाकिस्तानचे हे दावे पूर्णपणे खोडून काढले आहेत. मसूद अझहरने दहशतवादाचा विस्तार करण्यासाठी ‘जमात-उल-मुमिनत’ नावाची महिला शाखा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून महिलांमध्ये कट्टरता पसरवणे आणि दहशतवादासाठी रसद पुरवण्याचे काम सुरू आहे.

काश्मीरमधील हल्ल्यांचाही उल्लेख
अहवालात केवळ दिल्लीच नव्हे, तर एप्रिल २०२५ मध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचाही संदर्भ देण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) ने घडवून आणला होता, जी प्रत्यक्षात लष्कर-ए-तैयबाचीच एक उपशाखा (प्रॉक्सी) असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जैशच्या सक्रियतेवरून जागतिक मतभेद
जैश-ए-मोहम्मदच्या सद्यस्थितीबद्दल काही सदस्य देशांमध्ये मतभेद असले, तरी भारताने पुरवलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे ही संघटना आजही सक्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. २८ जुलै २०२५ रोजी भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!