Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC निवडणुकीसाठी ‘ठाकरे’ बंधू एकत्र येणार? अनिल परबांची ‘शिवतीर्थ’वर धाव; मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा अंतिम टप्प्यात

BMC निवडणुकीसाठी ‘ठाकरे’ बंधू एकत्र येणार? अनिल परबांची ‘शिवतीर्थ’वर धाव; मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा अंतिम टप्प्यात

BMC Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आता ‘ठाकरे’ बंधूंच्या युतीची शक्यता बळावली आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतरच अधिकृत घोषणा?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. अनिल परब आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जोपर्यंत जागावाटपाचा ठोस फॉर्म्युला ठरत नाही, तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा टाळण्याचे दोन्ही बाजूंनी ठरले असल्याचे समजते.

हेही वाचा – Ravindra Dhangekar: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली; पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार

चर्चा सकारात्मक, राज ठाकरेच माहिती देतील: नितीन सरदेसाई

या महत्त्वाच्या भेटीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, युतीबाबतची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असून सर्व काही सुरळीत सुरू आहे. वातावरण अत्यंत सकारात्मक असून आगामी काळात अशा भेटीगाठी सुरूच राहतील. युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होईल, हे स्वतः राज ठाकरेच योग्य वेळी स्पष्ट करतील.

हेही वाचा – Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! हाय कोर्टाकडून जामीन मंजूर, पण आमदारकीवर टांगती तलवार कायम

महायुतीत जागा वाटपावरून पेच

एकीकडे ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत (भाजप-शिंदे गट) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप नेते अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात १३० जागांवर सहमती झाली आहे. मात्र, अद्याप ७७ जागांवरून दोन्ही पक्षांत मतभेद कायम आहेत. या उर्वरित जागांबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!