Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Zim vs Ind T20I Series Schedule : BCCI कडून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तारखा जाहीर; सामने कधी, कुठे अन् किती होणार? वाचा

Zim vs Ind T20I Series Schedule : BCCI कडून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तारखा जाहीर; सामने कधी, कुठे अन् किती होणार? वाचा

India Tour of Zimbabwe For 3th-match T20I Series : भारतीय क्रिकेट संघ टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा जुलै महिन्यात होणार असून, टीम इंडियाच्या वेळापत्रकात आणखी एका मालिकेची भर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हरारे येथे पार पडणार आहेत. पहिला टी-20 सामना 24 जुलै रोजी, दुसरा 25 जुलैला तर तिसरा आणि अंतिम सामना 26 जुलैला खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळून टीम इंडिया झिम्बाब्वेकडे रवाना होईल.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक

23 जुलै 2026 : पहिला टी-20 सामना, हरारे

25 जुलै 2026 : दुसरा टी-20 सामना, हरारे

26 जुलै 2026 : तिसरा टी-20 सामना, हरारे

2024 मध्ये भारताचा अखेरचा झिम्बाब्वे दौरा…

भारतीय संघाने झिम्बाब्वेचा शेवटचा दौरा जुलै 2024 मध्ये केला होता. त्या वेळी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेसाठी स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याच्याकडे भारतीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला झिम्बाब्वेकडून पराभवाचा धक्का बसला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले आणि 4-1 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.

2027 मध्ये झिम्बाब्वेचा भारत दौरा

पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2027 मध्ये जिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई येथे रंगणार आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत-झिम्बाब्वे आमनेसामने

अलीकडे झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्येही भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना रंगला होता. सुपर 8 फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने 4 गडी गमावून तब्बल 256 धावा केल्या. 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 6 बाद 184 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी भारताने हा सामना तब्बल 72 धावांनी जिंकला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!