Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cabinet Decision: नव्या आर्थिक वर्षाची धमाकेदार सुरुवात; शेतकरी, विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी मंत्रिमंडळाचा खजाना खुला; पाहा आजचे 6 मोठे निर्णय

Cabinet Decision: नव्या आर्थिक वर्षाची धमाकेदार सुरुवात; शेतकरी, विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी मंत्रिमंडळाचा खजाना खुला; पाहा आजचे 6 मोठे निर्णय

Cabinet Decision: नव्या आर्थिक वर्षाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ६ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिंचन, पर्यावरण आणि सामाजिक कल्याणावर भर देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

१. दुष्काळी भागाला दिलासा: साकळाई योजनेसाठी १,२३४ कोटी
अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासाठी सरकारने मोठी तरतूद केली आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेला १,२३४ कोटी रुपयांची मान्यता मिळाल्याने ३२ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. यामुळे सुमारे ९,६०० हेक्टर शेती ओलिताखाली येईल.

२. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ५४ अतिप्रदूषित नदी पट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी हे प्राधिकरण युद्धपातळीवर काम करणार आहे.

३. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत १२ वर्षांनंतर वाढ
राज्यातील आठवी ते बारावीच्या हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत सरकारने भरीव वाढ केली असून, यामुळे त्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे.

४. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट
भूमि अभिलेख विभागात आता ‘भूकरमापक’ हे पद ‘परिरक्षण भूमापक’ म्हणून ओळखले जाईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग मोकळे झाले असून, विभागीय भरतीद्वारे हे पदे भरली जातील.

५. आरक्षण उपवर्गीकरणासाठी उच्चस्तरीय समिती
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात आलेल्या विविध निवेदनांचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती नेमण्याचा निर्णय बैठकीत झाला.

६. अमरावतीत खेळाडूंना मिळणार मोठे मैदान
अमरावती महापालिका क्षेत्रातील मौजे नवसारी येथील १६,७०८ चौ.मी. जागा क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या जागेचा ताबा क्रीडा विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!