Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

घरातील वृद्धांची काळजी घेण्यासाठी केअरटेकर शोधताय? तर ‘या’ गोष्टी नक्की पाहा…

घरातील वृद्धांची काळजी घेण्यासाठी केअरटेकर शोधताय? तर ‘या’ गोष्टी नक्की पाहा…

बालपण, तरुणपण आणि वृद्धत्त्व हे सर्वांच्याच आयुष्यात असतं. हा अविभाज्य घटकही आहे. जन्मापासून सोबत असलेल्या, काळजी घेणाऱ्या पालकांना किंवा आजी-आजोबांना घरी एकटे ठेवून जाणे किती कठीण असते हे अनेकांना माहिती असेल. तरीही नोकरीसाठी, काम-धंद्यासाठी बाहेर तर पडावेच लागते. तेव्हा घरातील आपल्या या ज्येष्ठ मंडळींची काळजी घेण्यासाठी केअरटेकरचा शोध घेतला जातो. पण, हाच शोध घेताना काही काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

केअरटेकर शोधताना त्याच्याकडे ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या कामाचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच मूलभूत ओळखपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. केअरटेकरने स्वतःविषयी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आधीच्या कामाच्या ठिकाणी विचारणा करून मगच केअरटेकरला कामावर रुजू करून घ्यावे. याने पुढील धोका टाळता येऊ शकतो. ज्येष्ठांना रोजच्या घरातील कामांमध्ये मदत लागते का?, त्यांना विस्मरणाची सवय आहे का?, त्यांच्याकडे सारखे लक्ष द्यावे लागते का? या सर्व गोष्टींचा विचार करून मगच योग्य तो केअरटेकर निवडा.

यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केअरटेकरच्या कामाचे स्वरूप, पगार, बोनस, सुट्ट्या, कामाची वेळ, सुट्टीवर असताना ज्येष्ठांची सोय करण्यासाठी पर्यायी व्यवस्था, कामाची गोपनीयता, काम सोडतानाची प्रक्रिया या सर्व गोष्टी केअरटेकरबरोबर करार करून त्यात नमूद केल्या पाहिजेत. यामुळे रुजू झाल्यावर काय करायचे किंवा हे करणे अपेक्षित होते वगैरे असे मुद्दे उद्भवणार नाहीत. तसेच त्याच्या कामाच्या अनुभवाची योग्य माहिती घेतल्यास आणखीनच सोपं जाऊ शकतं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!