Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्टार आणि रेटिंग पाहून ऑनलाईन शॉपिंग करताय? तर थांबा; बसू शकतो मोठा फटका

स्टार आणि रेटिंग पाहून ऑनलाईन शॉपिंग करताय? तर थांबा; बसू शकतो मोठा फटका

सध्या ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शॉपिंगला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला सर्वात आधी लक्षात येते की उत्पादनाच्या खाली ५-स्टार रेटिंग दिसते. मग ते मोबाईल फोन, हेडफोन किंवा स्वयंपाकघरातील भांडी खरेदी असोत, आपण असे गृहीत धरतो की अधिक स्टार म्हणजे चांगले उत्पादन. पण, हे असं नसते. यातून तुमची फसवणूक होऊ शकते.

वाढत्या ई-कॉमर्स मार्केटसह, एक नवं विश्व उदयास आले आहे. Amazon आणि Flipkart सारख्या प्लॅटफॉर्मवर बनावट रिव्ह्यू दिसत आहे. ५-स्टार रिव्ह्यूने लिहिली जातात, विकली जातात आणि अनेकदा तयार केली जातात. ग्राहकांना वाटते की त्यांनी हजारो लोकांच्या मतांवर आधारित निर्णय घेतला आहे. परंतु बहुतेकदा, ती मते खरी नसतात. ही केवळ काही खोडकर व्यक्तींची कहाणी नाही. ही एक संपूर्ण प्रणाली आहे. त्यामध्ये वेगवेगळे ग्रुप कार्यरत असतात.

काही लोक पैशासाठी रिव्ह्यूने लिहितात, तर काहींना ५-स्टार रिव्ह्यूने लिहिण्यासाठी मोफत उत्पादने दिली जातात. काही केसेसमध्ये, एकच व्यक्ती अनेक नावांनी रिव्ह्यूने पोस्ट करते. आणि काही केसेसमध्ये, संगणकाद्वारे तयार केलेले रिव्ह्यू देखील वापरली जातात. त्यामुळे या पद्धतीमुळे काही दिवसांतच एखाद्या उत्पादनावर शेकडो सकारात्मक रिव्ह्यू येऊ शकतात. त्यामुळे आता ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!