मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यातच मंगळवारीही शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. बीएसई सेन्सेक्स ६१५ अंकांनी घसरून ८२६३० वर व्यवहार करताना दिसला. तर निफ्टी २१८ अंकांनी घसरून २५३६८ वर दिसून आला. निफ्टी बँक ३२५ अंकांनी घसरली आहे.
आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स थोडेसे वाढले आहेत, परंतु इतर सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसईच्या टॉप ३० पैकी २६ शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली आहे. झोमॅटो, सन फार्मा, इंडिगो आणि रिलायन्स सारख्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. त्यानंतर टायटन, टीसीएस, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टेक महिंद्रा यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
मिड-कॅप श्रेणीत, ओबेरॉय रिअल्टीचे शेअर्स ८.६३ टक्क्यांनी घसरले. UPL चे शेअर्स ७.७८ टक्के घसरले आणि व्होल्टासचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले. स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये, डेटा पॅटर्नचे शेअर्स ९ टक्क्यांहून अधिक घसरले आणि ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले. LTMI माइंडट्रीचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले आणि ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स जवळपास ८ टक्क्यांहून अधिक घसरले.
कोणत्या क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त घसरण?
रिअल्टी क्षेत्रात ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर केमिकल क्षेत्रात २.३९ टक्के घसरण झाली. शिवाय, वित्तीय सेवा, ग्राहक आणि तेल आणि वायूसह सर्व क्षेत्रे रेड झोनमध्ये व्यापार करत होते.
७.६७ लाख कोटी रुपयांचे नुकसान
शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे मंगळवारी बीएसई बाजार भांडवल ७.६७ लाख कोटी रुपयांनी घसरले. सोमवारी ४६५.६८ लाख कोटी रुपयांचे असलेले बीएसई बाजार भांडवल मंगळवारी ४५७.९९ लाख कोटी रुपयांवर घसरले.


