मुंबई : माही विज आणि जय भानुशाली यांचा घटस्फोट काही दिवसांपूर्वीच झाला. या घटस्फोटानंतर माही विज आयुष्याला नवीन सुरुवात करताना दिसत आहे. माही विजने तिच्या आयुष्यातील एका नवीन सुरुवातीची झलक दाखवली आहे. जय भानुशालीपासून परस्पर संमतीने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर, माहीने तिच्या नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत.
माहीने फोटो शेअर करताना ‘नवीन सुरुवात’ असेही लिहिले आहे. माहीने तिच्या नवीन घरात होणाऱ्या पूजाचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे कुटुंबीय एकत्र पूजा करताना दिसत आहेत. तिने घरातील सुंदर दृश्य देखील दाखवले. फोटोंमध्ये माही खूप आनंदी दिसत होती. अभिनेत्रीने तिचे आयुष्य नव्याने सुरू केल्याचा आनंदही व्यक्त केला. माहीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिच्या नवीन घरात होणाऱ्या पूजाची झलक दाखवली आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने घरातील फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये तिने लिहिले की, ‘नवीन सुरुवात’. माहीने अद्याप काहीही स्पष्टपणे सांगितले नाही, तरी चाहत्यांना वाटते की तिने एक नवीन घर खरेदी केले आहे. नुकतीच माहीने एक नवीन कार खरेदी केली. अभिनेत्री आरती सिंगने त्याची एक झलक शेअर केली. फोटोमध्ये, माही एका नवीन आलिशान कारसमोर उभी होती, जी आरतीने तिला अभिनंदन करण्यासाठी पोस्ट केली. त्यानंतर आता माहीने नवीन घर खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.


