नाष्टा चांगला केल्यास दिवसभर शक्ती, ऊर्जा मिळते. त्यात नाष्ट्यात आलू पराठा खाणे ही उत्तर भारतात एक सामान्य परंपरा आहे. काही लोक दररोज नाष्ट्यात आलू पराठा खातात. पण, दररोज आलू पराठा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. दररोज आलू पराठा खाल्ला तर काय होईल याचे उत्तर ते कसे तयार केले जाते, तुम्ही ते कशासोबत खाता आणि तुमच्या एकूण खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते.
सर्व घटक एकत्रितपणे या आवडत्या नाष्ट्याचे तुमच्या शरीरावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय परिणाम करतात हे समोर आले आहे. नाष्ट्यात आलू पराठा खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. कारण त्यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते आणि तुम्हाला काही तास पोट भरल्यासारखे वाटू शकते. पराठा दररोज खाल्ल्याने लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयरोग होण्याचा धोका वाढू शकतो. कारण त्यात कार्बोहायड्रेट आणि फॅट जास्त असतात. ते सहसा तेल, लोणी किंवा तूप वापरून बनवले जाते, त्यामुळे वजन वाढू शकते. कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.
मर्यादित शारीरिक हालचाली असलेल्या लोकांसाठी, दररोज पराठे खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. आलू पराठ्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. आलू पराठा कसा खाता हे देखील महत्त्वाचे आहे. दही किंवा भाज्यांसोबत ते खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. कारण ते प्रथिने आणि फायबर प्रदान करतात.


