नवी दिल्ली : सध्या हिवाळा सुरु झाला आहे. त्यात थंडीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना प्राधान्य दिलं जातं. हिवाळा सुरू झाला आहे. बदलत्या हवामानामुळे अनेकांना ताप, खोकला आणि सर्दी यांचा त्रास होतो. घरातील वृद्धांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारात वेगवेगळ्या किंमतींमध्ये असंख्य रूम हीटर उपलब्ध आहेत. स्वस्त रूम हीटर देखील उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ७९९ पासून सुरू होते. लाइफलाँगचा स्वस्त रूम हीटर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ९९९ मध्ये उपलब्ध आहे. लाईफलाँग इन्फिनिया प्लस हा एक रूम हीटर आहे जो २०००W ब्लोअरसह येतो. तो ISI-प्रमाणित फॅन हीटरसह देखील येतो. त्यात दोन हीटिंग मोड आहेत. लाँगवे मॅग्मा रूम एअर हीटर Amazon.in वर उपलब्ध आहे. त्याची किंमत ७९९ आहे. हे दोन १०००W आणि २०००W मोडमध्ये येतात. त्यात ओव्हरहीट प्रोटेक्शन फीचर देखील आहे.
वॉल-माउंटेड इलेक्ट्रिक एअर हीटर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लिस्टेड असणार आहे. त्याची किंमत ८४९ आहे. ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बसवता येते. ते सायलेंट इन्फ्रारेड फॅन वापरते. क्रॉम्प्टन कम्फर्ट निओ रूम हीटर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. Amazon.in वर त्याची किंमत १५९९ आहे. हीट आउटपुट अॅडजस्टेबल आहे आणि त्यात ओव्हरहीट प्रोटेक्शन देखील आहे.


