पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी येथे सल्लागार (राईट ऑफ वे) आणि तज्ञ (राईट ऑफ वे) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई, पुणे, नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत चार रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. 6५ वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी sedexpert@mahatransco.in येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


