आपण सुंदर दिसावं असे अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. महिला तर अनेक उत्पादने ट्राय करतात. जर चेहऱ्याला सूट झाले तर त्या नंतरही तेच वापरतात. मात्र, जर नाही सूट झाले तर ते टाळणेही पसंत करतात. त्यात आता दिवाळी जवळ आली आहे. जर कोणी एक रूटीन फॉलो करायला सुरुवात केली तर त्यांना लक्षणीय फायदे दिसू शकतात.
सुंदर दिसण्यासाठी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी ध्यान करणे गरजेचे आहे. मंत्र जपावे आणि ध्यान प्रक्रिया सुरु ठेवावी. आध्यात्मिक पुस्तके वाचावीत. भक्तिगीते खूप ऐकावी. त्वचेची काळजी घेण्याच्या दिनक्रमही ठरवावा. त्यात चेहऱ्यावर दही आणि बेसनाचे मिश्रण लावावे. त्यामुळे काही लक्षणीय बदल होतो. जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता तेव्हा तुमचा चेहरा चमकतो. त्यामुळे हे उपाय करण्याबरोबच इतरही काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
चेहऱ्यावर दही आणि बेसनाचे मिश्रण लावल्यास फायद्याचे ठरते. जर तुम्हाला हे करून पाहायचे असेल तर २ टेबलस्पून बेसन आणि २ टेबलस्पून दह्याचे मिश्रण करून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि १५-३० मिनिटे सुकू द्या. सुकल्यानंतर, कोमट पाण्याने स्वच्छ धुवा, हलक्या हाताने स्क्रब करा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.
दही आणि बेसन लावल्याने उजळतो त्वचेचा रंग
दही आणि बेसन लावल्याने त्वचेचा रंग उजळतो, डाग आणि टॅनिंग कमी होते, त्वचा मऊ होते आणि ती हायड्रेट होते. स्क्रबिंगमुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते, मुरुमे कमी होतात आणि त्वचेचा पीएच पातळी संतुलित होते.


