Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accidents: पुणे शहरात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू

Pune Accidents: पुणे शहरात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू

Pune Accidents: पुणे शहरात एका दिवसात घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या तिन्ही दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पहिली घटना तळेगाव कॅम्प परिसरातील आहे. सीआरपीएफमधील एक कॉन्स्टेबल आपल्या मुलीला घेण्यासाठी पुणे-मुंबई महामार्ग ओलांडत असताना एका वेगवान कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी दुर्घटना पुणे-सोलापूर महामार्गावर बोरीपारधी गावाजवळ घडली. एका खाजगी बसची आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला, तर सोबत असलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहराच्या आणखी एका भागात झालेल्या वेगळ्या अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेविषयीचे तपशील अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तिन्ही घटनांमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवण्याबद्दल गुन्हे नोंदवले आहेत.

हेही वाचा –Pune Zilla Parishad Election: पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव

स्थानिक नागरिकांनी वाढत्या अपघातांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी, रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने शहरात वाहतूक गस्त वाढविण्याचा, तपासणी नाके उभारण्याचा आणि अपघातांचे कारण शोधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज आता अधिक अधोरेखित झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!