Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोल्हापूरच्या कन्येची सातासमुद्रापार भरारी! अमेरिकेत उपमहापौरपदी उर्मिला अर्जुनवाडकर यांची निवड

कोल्हापूरच्या कन्येची सातासमुद्रापार भरारी! अमेरिकेत उपमहापौरपदी उर्मिला अर्जुनवाडकर यांची निवड

Urmila Purandare Arjunwadkar : महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा डंका आता अमेरिकेतील राजकारणातही वाजू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरच्या सुकन्या उर्मिला अशोक पुरंदरे-अर्जुनवाडकर (उमा) यांची अमेरिकेतील न्यूजर्सी प्रांतातील होपवेल टाउनशिपच्या उपमहापौरपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. या नियुक्तीमुळे जागतिक राजकारणात मराठी पाऊल अधिक भक्कम झाले असून, जयसिंगपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जयसिंगपूर ते न्यूजर्सी: एक थक्क करणारा प्रवास

उर्मिला अर्जुनवाडकर यांचा हा प्रवास अत्यंत जिद्दीचा आणि संघर्षाचा आहे. जयसिंगपूरमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम. एससी. (M.Sc.) पदवी संपादन केली. गेल्या २५ वर्षांपासून त्या अमेरिकेत प्रतिष्ठित औषध कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. अशोक पुरंदरे हेदेखील नामांकित शास्त्रज्ञ आहेत. २०२१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा नगरसेविका म्हणून राजकारणात प्रवेश केला. २०२४ च्या निवडणुकीत ६१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला होता.

लोकप्रियतेचे रहस्य आणि उल्लेखनीय कार्य

उपमहापौर म्हणून उर्मिला यांनी केलेल्या कामामुळे त्यांना ही पुन्हा संधी मिळाली आहे. कोविड काळानंतर त्यांनी आरोग्य सुविधा आणि लसीकरण मोहिमेत मोठे नेतृत्व केले. त्यांच्या पर्यावरण पूरक धोरणांमुळे होपवेल टाउनशिपला न्यूजर्सी राज्याचा मानाचा पुरस्कार मिळाला. शहराच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक खेचून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या सध्या प्लॅनिंग बोर्ड, पर्यावरण कमिशन आणि बोर्ड ऑफ हेल्थ यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

एका बाजूला औषध शास्त्रातील करिअर आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकन प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी, असा दुहेरी समतोल उर्मिला यांनी साधला आहे. २०२७ पर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. अमेरिकेतील स्थानिक स्वराज्य संस्थेत एका मराठी महिलेने आपल्या कार्याचा ठसा उमटवणे, ही राज्यातील तरुण पिढीसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!