Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Daund Politics : दौंडमध्ये शरद पवार गटाला मोठा सुरुंग! ‘कुल’ खेळीने बुरुज ढासळला; ‘हा’ नेता भाजपच्या गोटात

Daund Politics : दौंडमध्ये शरद पवार गटाला मोठा सुरुंग! ‘कुल’ खेळीने बुरुज ढासळला; ‘हा’ नेता भाजपच्या गोटात

Daund Politics : जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी ‘तुतारी’ सोडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने ही राजकीय खेळी यशस्वी केल्याने शरद पवार गटाला दौंडमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

राहुल कुल यांचा ‘मास्टरस्ट्रोक’

केवळ पक्षप्रवेशच नाही, तर आमदार राहुल कुल यांनी आप्पासाहेब पवार यांना खडकी–देऊळगाव राजे गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करून विरोधकांना चितपट केले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक दशकांपासूनची राजकीय समीकरणे एका रात्रीत बदलली आहेत.

हेही वाचा – NCP Merger : अजित पवार सत्तेतून बाहेर पडले तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, शरद पवारांच्या आमदारांचं मोठं विधान

नाराजी अन् पक्षांतराचे मुख्य कारण?

आप्पासाहेब पवार यांच्या भाजप प्रवेशामागे विधानसभेतील नाराजीचे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत आप्पासाहेब यांच्या रणनीतीमुळे सुप्रिया सुळे यांना दौंडमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. विधानसभेवेळी पक्षाने आप्पासाहेबांऐवजी माजी आमदार रमेश थोरात यांना पसंती दिली, ज्यामुळे ते नाराज होते. सातत्याने डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी अखेर भाजपची वाट धरली.

शरद पवार गटाची मोठी हानी

तालुक्यात संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांवर मजबूत पकड असलेले नेते म्हणून आप्पासाहेब पवार ओळखले जातात. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेताच नाही, तर कार्यकर्त्यांचा मोठा संचही भाजपच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंसाठी हा व्यक्तिगत स्तरावरही मोठा धक्का मानला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!