Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापुरात ‘मशाल’ पेटली! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ‘उबाठा’ गटाचे 12 उमेदवार रिंगणात

इंदापुरात ‘मशाल’ पेटली! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ‘उबाठा’ गटाचे 12 उमेदवार रिंगणात

इंदापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बुधवार, 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इंदापूर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 6 अशा एकूण 12 जागांसाठी ‘उबाठा’ गटाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

उबाठाचे जिल्हा परिषदेच्या 6 व पंचायत समितीच्या सहा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर पंचायत समितीच्या 16 व जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी तालुक्यात निवडणुक पार पडत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हा परिषदेच्या 6 जागा व पंचायत समितीच्या 6 जागांवर नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा – Indapur Election: ZP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शेळगाव-निमसाखर गणामध्ये भाजप कडून सत्यजीत रणवरे इच्छुक

जिल्हा परिषद गट: ‘उबाठा’ गटाचे अधिकृत शिलेदार

जिल्हा परिषदेच्या 6 महत्त्वाच्या गटांतून खालील उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज भरले आहेत:

  • काटी-लाखेवाडी गट: नितीन ज्ञानदेव शिंदे
  • निमगाव केतकी-शेळगाव गट: धनश्री सुदर्शन रणवरे
  • वडापुरी-माळवाडी गट: तात्या बबन पाटील
  • वालचंदनगर-कळस गट: मीरा प्रदीप आरडे
  • भिगवण-शेटफळ गढे गट: डॉ. वैशाली बाळासाहेब भोसले
  • बावडा-लुमेवाडी गट: राणुताई नानासाहेब इंगवले

पंचायत समिती गण: ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी

पंचायत समितीच्या 6 गणांतून पक्षाने खालील चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे:

  • लाखेवाडी गण: रेश्मा अभिजित पाटील
  • काटी गण: नितीन ज्ञानदेव शिंदे
  • शेळगाव गण: नितीन बुवासाहेब कदम
  • निमगाव केतकी गण: रणजित दादाराम बारवकर
  • वडापुरी गण: स्नेहल सचिन इंगळे
  • बिजवडी गण: सुधीर सुभाष पाटील

निवडणुकीत चुरस वाढणार

काटी-लाखेवाडी आणि निमगाव केतकी यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यात ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवणारे हे उमेदवार प्रस्थापित नेत्यांच्या सत्तेला सुरुंग लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!