Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chandrapur: मानवतेला काळीमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला विकायला लावली किडनी

Chandrapur: मानवतेला काळीमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला विकायला लावली किडनी

Chandrapur News: देशात ‘विकसित भारत’ आणि उज्ज्वल उद्याचे चित्र रंगवले जात असताना, विदर्भातील वास्तव मात्र अजूनही अंगावर काटा आणणारे आहे. स्वातंत्र्यानंतर दशकानुदशके दुर्लक्षित राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात गरिबी आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्यांना कुठल्या टोकाला नेऊन सोडले आहे, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. कर्ज फेडण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याला अक्षरशः स्वतःच्या शरीरावर सौदा करावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात राहणारा रोशन कुडे या शेतकऱ्याने खाजगी सावकाराकडून होणाऱ्या छळामुळे आपली किडनी विकावी लागल्याचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशनने उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज व्याजाने घेतले होते. मात्र दुर्दैवाने त्याची जनावरे दगावल्याने व्यवसाय कोलमडला आणि कर्जफेड करणे त्याला शक्य झाले नाही.

हेही वाचा – Farmer Suicide in Maharashtra: शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ; 11 महिन्यात मराठवाडा अन् विदर्भात आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर

सावकाराचा शेतकऱ्यावर दबाव

कर्ज थकल्याने सावकाराचा दबाव वाढत गेला. व्याजावर व्याज चढत गेले आणि देणी दिवसेंदिवस वाढतच राहिली. या परिस्थितीत सावकाराने पैसे मिळवण्यासाठी रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला. सावकाराच्या सांगण्यावरून रोशन आधी कोलकात्याला गेला, त्यानंतर त्याला कंबोडियात नेण्यात आले आणि तेथे त्याने सुमारे आठ लाख रुपयांना आपली किडनी विकल्याचा दावा केला आहे. या साऱ्या प्रकारामागे सावकारच जबाबदार असल्याचा आरोप करत रोशन कुडे यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी स्वतःचे अवयव विकण्यापर्यंत पोहोचतो, ही बाब राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता या प्रकरणात राज्य सरकार, प्रशासन आणि कृषी विभाग किती तत्परतेने पावले उचलतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!