Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sharad Pawar: महिनाभराच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित

Sharad Pawar: महिनाभराच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित

Sharad Pawar: एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते बुधवारी(दि १८)दुपारी बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी दाखल झाले.यावेळी पवार ‘अॅक्शन मोड’वर आलेले पहावयास मिळाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामतीत थांबून होते. मात्र, ९ फेब्रवारी पासून खोकल्याचा त्रास जाणवू लागला. मात्र, खोकल्याची उबळ वाढल्याने पवार उपचारासाठी पुणे शहरातील रुबी हाॅल रुग्णालयात दाखल झाले.

रूग्णालयातून ‘डीस्चार्ज’ घेतल्यानंतर थकवा जाणवत असल्याने २१ फेब्रवारी रोजी पवार यांना पुन्हा रुबी हाॅलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील उपचार पुर्ण झाल्यानंतर पवार मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांतीसाठी थांबून होते. बुधवारी दुपारी ते येथील निवासस्थानी दाखल झाले.

हेही वाचा- 11 महिन्यांत पुणे रेल्वे विभागात 4 लाखांहून फुकट्यांवर कारवाई; 227 कोटींचा दंड वसूल

त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बैठकीसाठी संस्थेचे खजिनदार युगेंद्र पवार, उपाध्यक्ष अॅड.अशोक प्रभुणे, सचिन निलीमा गुजर उपस्थित होते. यावेळी बैठकीत संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेत आवश्यक सूचना देखील केल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!