Anjali Damania on Ashok Kharat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंजाबमधील चंदीगड येथून राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी भोंदू अशोक खरातच्या सीडीआरची प्रतच बाहेर आणली. त्यात कोणी कोणी खरातला सर्वाधिक वेळा फोन केला याची कुंडलीच बाहेर काढली. त्या नावाने राज्याच्या राजकारणात महाभूकंप आला.
भोंदूबाबा अशोक खरातच्या राजकीय कनेक्शनने मोठी उलथापालथ झाली आहे. अजून एकही राजकीय बळी गेला नसला तरी खरातचे सिंडिकेट मोठे असल्याचे तपासात समोर आले आहे. काही नेतेमंडळींची नावे समोर आली आहेत. त्यांचे खरात सोबतचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. पण प्रत्येक जण आपला आणि त्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करत आहेत. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्याशी तो कितीवेळ बोलला. त्याने कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले. तर त्याला कोणत्या नेत्याने कितीवेळा फोन केला. दोघांमध्ये कितीवेळा बोलणे झाले याची इत्यंभूत माहिती अंजली दमानिया यांनी बाहेर आणली. त्यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर केला आहे. एका लग्न समारंभानिमित्त त्या चंदीगडला आहेत. त्यांनी याविषयीची माहिती समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर करून दिली.
रुपाली चाकणकरांचे 177 आणि बहिणीचे 236 कॉल
रुपाली चाकणकरच नाही तर अनेक नेत्यांनी अशोक खरात याला कॉल केले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केले. रूपाली चाकणकर यांनी एकूण 177 कॉल खरातला केले आहेत. यामध्ये दोघांमध्ये 33 हजार 727 सेकंदाचे संभाषण झाले. तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी भोंदू खरातला 236 कॉल केले आहेत
एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल
तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत. या 17 कॉल्समध्ये 10 इनकमिंग, 7 आऊटगोईंग कॉल्स झाले आहेत. अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले आहेत तर ते कशा संदर्भात झाले आहेत ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे असे दमानिया यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल, सुनील तटकरे यांचे 8 कॉल
चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी 8 कॉल आहेत. हे सगळे नॉर्मल कॉल आहेत व्हॉट्सॲपबद्दल माहिती नाही, व्हॉट्सॲपची माहिती मिळत नसते, असे दमानिया म्हणाल्या
रुपाली चाकणकरांवर पुन्हा निशाणा
अनेक माहिती या संस्था पुढे येत असतात असतात पण सर्वसामान्य जनतेपुढे पण ती माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व काही सांगत आहे. आता समजा पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झाला आहे तर तो कुटुंबातील सदस्या वा जवळच्या व्यक्ती सोबत आहे आणि त्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यासोबत आहे. 33 हजार पेक्षा जास्त सेकंद रूपाली चाकणकर यांच्यासोबत सोबत बोलणं झालं आहे, असा निशाणा अंजली दमानिया यांनी साधला.


