Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election: मोठी बातमी! पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

PMC Election: मोठी बातमी! पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

PMC Election 2025: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची अंतिम प्रभाग रचना आता निश्चित झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली असल्याची माहिती महापालिकेचे उपयुक्त प्रसाद काटकर यांनी दिली. येत्या सोमवारपर्यंत ही अंतिम वॉर्ड रचना गॅझेटमध्ये प्रसिद्ध होणार आहे.

नागरिकांच्या हरकतींवर सविस्तर सुनावणी

महापालिकेने काही आठवड्यांपूर्वी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यावर नागरिकांना 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. शहरभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, एकूण 5843 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. नागरिकांनी प्रभागांची नावे बदलणे, नैसर्गिक हद्दीतील बदल, तसेच स्थानिक क्षेत्रीय संतुलन यांसारख्या विषयांवर आक्षेप घेतले होते.

हेही वाचा – Gautami Patil : महाराष्ट्राला घायाळ करणारी गौतमी पाटील अडचणीत? ‘त्या’ प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

प्राधिकृत अधिकाऱ्यांची सुनावणी आणि अहवाल

या सर्व हरकतींवर सुनावणीसाठी शासनाने अपर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) व्ही. राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या सुनावण्या 11 आणि 12 सप्टेंबर रोजी झाल्या. सर्व आक्षेप आणि सूचना तपासल्यानंतर अधिकाऱ्यांनी आपला अंतिम अहवाल नगर विकास विभागाकडे पाठवला, ज्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – Nilesh Ghaywal : पुणे पोलीस निलेश घायवळला फरफटत भारतात आणणार? आयुक्तांनी उचललं मोठं पाऊल

अंतिम आराखड्याला मंजुरी

या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेस अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत गॅझेट अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणुकीची तयारी अधिकृतपणे सुरू होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!