Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ZP Election Date: मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला होणार मतदान?

ZP Election Date: मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला होणार मतदान?

ZP Election Date: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी ४ वाजता महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा होऊन आजपासूनच आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दिलासा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने तयारीसाठी वाढीव मुदत मागितली होती. सोमवारी न्यायालयाने आयोगाची ही विनंती मान्य करत १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे

आज सायंकाळी ‘सह्याद्री’वर पत्रकार परिषद

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज सायंकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या परिषदेत निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक, टप्पे आणि आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!