Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठरलं तर…! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ‘या’ दिवशी होणार; ‘या’ नेत्याचं नाव आहे आघाडीवर?

ठरलं तर…! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ‘या’ दिवशी होणार; ‘या’ नेत्याचं नाव आहे आघाडीवर?

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख अखेर समोर आली आहे. भाजप अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १९ आणि २० जानेवारी रोजी पार पडणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १९ जानेवारी रोजी अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले जाणार असून, २० जानेवारी रोजी अधिकृत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षातील दहा वरिष्ठ नेते आणि संघटनात्मक पदाधिकारी प्रस्तावक म्हणून असणार असल्याची चर्चा आहे.

नितीन नबीन यांची उमेदवारी सर्वाधिक मजबूत

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बिहारचे मंत्री नितीन नबीन हे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वाधिक आघाडीवर आहेत. जर त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरतील. त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२९ पर्यंत असण्याची शक्यता असून, २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. यापूर्वी २०२० मध्ये जे. पी. नड्डा यांची प्रथम कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती आणि नंतर त्यांना कायमस्वरूपी अध्यक्षपद देण्यात आले होते.

सलग पाच वेळा आमदार, संघटनात्मक अनुभव भक्कम

१५ डिसेंबर २०२५ रोजी नितीन नबीन यांची भाजपच्या कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र खरमास कालावधीमुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया लांबली. ४५ वर्षीय नितीन नबीन हे सध्या बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. नितीन नबीन यांनी २००६, २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ मध्ये सलग पाच वेळा बंकीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

२९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांचा अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. ३७ पैकी २९ राज्यांमध्ये अंतर्गत निवडणुका पूर्ण झाल्या असून, या राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ नामांकन पत्रांचा संच दाखल करणार आहेत. तसेच भाजप राष्ट्रीय परिषदेचे सदस्यही स्वतंत्र नामांकन पत्रांच्या माध्यमातून पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष कसा निवडला जातो?

भाजपच्या संविधानातील कलम १९ नुसार, राष्ट्रीय आणि राज्य परिषदेचे सदस्य मिळून एक इलेक्टोरल कॉलेज तयार होते. हेच कॉलेज राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करते. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराने किमान १५ वर्षे पक्षाचा प्राथमिक सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तावक म्हणून इलेक्टोरल कॉलेजचे किमान २० सदस्य असणे बंधनकारक आहे.

नामांकन दाखल झाल्यानंतर मतदान होते, त्यानंतर दिल्लीत मतमोजणी होऊन नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली जाते. भाजपच्या नियमानुसार, एक पात्र सदस्य सलग दोन वेळा तीन वर्षांचा कार्यकाळ अध्यक्ष म्हणून भूषवू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!