Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Municipal Election 2026: भाजपमध्ये हकालपट्टी सत्र सुरू! माजी नगरसेवकांसह 27 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता; धक्कादायक कारण समोर

Municipal Election 2026: भाजपमध्ये हकालपट्टी सत्र सुरू! माजी नगरसेवकांसह 27 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता; धक्कादायक कारण समोर

Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जळगावमध्ये माजी नगरसेवकांसह 27 जणांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षशिस्त भंग केल्याचे कारण भाजपकडून देण्यात आले आहे. महायुती व भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या माजी नगरसेवक जितेंद्र मराठेंसह तब्बल 27 जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल>्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केली आहे.

अनेकांची तिकीटे कापली
महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी रांग लागली होती. सुमारे 500 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. मात्र जागावाटपात भाजपला केवळ 46 जागांवर अधिकृत उमेदवार द्यावे लागल्याने अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तिकीटे कापण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या काही इच्छुकांनी बंडखोरी करत थेट भाजप व महायुतीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीत उडी घेतली.

महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा
या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसांपूर्वी बंडखोर उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. दोन दिवसांत उमेदवारी मागे घेऊन महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, संबंधितांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने अखेर पक्षाने कठोर पाऊल उचलत 27 जणांची थेट हकालपट्टी केली.

हकालपट्टी झालेल्यांची नावे

संगीता गोकुळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयूर श्रावण बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीश कैलास भोळे, कैलास बुधा सूर्यवंशी, जितेंद्र भगवान मराठे, प्रिया विनय केसवानी, रुपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयुरी जितेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्ज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोकिळा प्रमोद मोरे.
दरम्यान, बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे काही प्रभागांमध्ये भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ही बंडखोरी भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!