Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापुरात ओवैसींचा ‘पवार’ पॅटर्नवर हल्लाबोल; म्हणाले, ‘अजित पवारांना मत देणे म्हणजे…’

सोलापुरात ओवैसींचा ‘पवार’ पॅटर्नवर हल्लाबोल; म्हणाले, ‘अजित पवारांना मत देणे म्हणजे…’

Asaduddin Owaisi Solapur Speech: अजित पवार सध्या नरेंद्र मोदींच्या गोदीत जाऊन बसले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करणे म्हणजे मोदींच्या धोरणांना आणि त्यांनी आणलेल्या वक्फ कायद्याला पाठिंबा देणे होय, अशा बोचऱ्या शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी महायुतीवर निशाणा साधला. सोलापूरच्या ‘नई जिंदगी’ परिसरात झालेल्या सभेत त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार तौफिक शेख यांच्यावरही कडाडून टीका केली.

एक दिवस हिजाब परिधान केलेली महिला पंतप्रधान होईल

भारतीय संविधानाचा गौरव करताना ओवैसी म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक भारतीयाला पंतप्रधान होण्याची संधी आहे. पाकिस्तानच्या घटनेत केवळ एकाच धर्माचा व्यक्ती राष्ट्रप्रमुख होऊ शकतो, पण भारतात तसे नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस पाहण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण तो दिवस नक्की येईल.”

हेही वाचा – अंबरनाथमध्ये भाजपची फोडाफोडी अयशस्वी! शिंदे सेना अन् अजित पवारांची हातमिळवणी; सत्तेचं समीकरण पुन्हा पालटलं

अजित पवारांना थेट आव्हान

अजित पवारांवर टीका करताना ओवैसींचा पारा चढलेला पाहायला मिळाला. ते म्हणाले, “तुमचा राजकीय बाप असलेल्या अजित पवारांना माझ्या समोर बसवा, तीन मिनिटांत त्यांना निरुत्तर केले नाही तर सांगाल. त्यांना दर्गा किंवा मशिदींशी काहीही देणेघेणे नाही, ते केवळ तुमच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मोदी, शिंदे आणि अजित पवार ही एकच त्रिमूर्ती आहे.”

सोलापूरसाठी आश्वासनांची खैरात

ओवैसी यांनी सोलापूरच्या विकासासाठी अनेक आश्वासने दिली. त्यांनी नई जिंदगी परिसरात १६ इंची पाण्याची पाईपलाईन आणि प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच फातिमा शेख यांच्या कार्याचा उल्लेख करत मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. एमआयएमचे चार नगरसेवक निवडून आल्यास या परिसरासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका (Ambulance) सुरू करणार असल्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!