Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

देवेंद्र फडणवीसांना देवा भाऊ नव्हे तर ‘टक्का’भाऊ म्हणा; हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

देवेंद्र फडणवीसांना देवा भाऊ नव्हे तर ‘टक्का’भाऊ म्हणा;  हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis: राज्यातील वाढती गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराचे खरे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तोफ डागली. मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.

‘देवाभाऊ’ ते ‘टक्काभाऊ’: भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘टक्काभाऊ’ असा करत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सध्या वसुलीच्या तीन मार्गांनी तिजोरी भरत आहेत. शासकीय योजना आणि निधी वाटप करताना मोठी टक्केवारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात जे असभ्य राजकारण आणि केसाने गळा कापण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामागे फडणवीस यांचीच मानसिकता आहे.”

हेही वाचा – Congress-Vanchit Alliance: मोठी बातमी! काँग्रेस-वंचितची ऐतिहासिक युती; कोणालाचं नाही जमलं ते हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दाखवलं

संघाच्या संस्थापकांना पुसण्याचा डाव?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदर्भ दिला. मोदी आणि शहा यांना संघाच्या संस्थापकांचे नाव पुसून स्वतःचे वर्चस्व निर्माण करायचे आहे. भविष्यात रेशीमबागेतील गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारांच्या फोटोंच्या जागी मोदी-शहांचे फोटो लावण्याची यांची मानसिकता असून, महाराष्ट्रात फडणवीस या विचारांचे नेतृत्व करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!