Today गुरूवार, 30th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Free Health Camp: माळवाडीत ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य शिबिर; 103 मजुरांची मोफत तपासणी व औषधोपचार

Free Health Camp: माळवाडीत ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य शिबिर; 103 मजुरांची मोफत तपासणी व औषधोपचार

Free Health Camp: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ‘कर्मयोगी’ शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील माळवाडी नंबर 1 येथे ऊसतोड मजुरांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दिनांक 5 जानेवारी रोजी पार पडलेल्या या शिबिरात मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.

मजुरांना मिळाले हक्काचे उपचार

या शिबिरामध्ये परिसरातील एकूण 103 ऊसतोड मजुरांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मजुरांना आवश्यक ते औषधोपचार मोफत पुरवण्यात आले. आरोग्याचे निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांनी मजुरांना पुढील उपचारांसाठी मोलाचे सल्लेही दिले. “अशा शिबिरांमुळे आमचा दवाखान्याचा मोठा खर्च वाचतो,” अशी भावना यावेळी ऊसतोड मजुरांनी व्यक्त करत ट्रस्टचे आभार मानले.

हेही वाचा – Tanishka Phalphale: इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! तनिष्का आत्माराम फलफले हिची ‘इस्रो’मध्ये निवड

यशस्वीतेसाठी टीमचे परिश्रम

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. सारंगी कुंभार, केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, हनुमंत गोफणे यांच्यासह नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शिरसोडी ‘अ’ विभागाचे प्रमुख ए. के. भोंगळे, शिरसोडी ‘ब’ विभागाचे प्रमुख आर. के. नलवडे, कर्मयोगीचे कर्मचारी अनिल व्यवहारे आणि भारत गडदे यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली.

खाऊ वाटपाने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद

या आरोग्य शिबिरादरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर आणि ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांची भेट घेतली. कष्टाच्या कामात मजुरांच्या मुलांचे बालपण जपण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. अचानक मिळालेल्या या भेटीमुळे आणि खाऊमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!