Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुणे हादरले! आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण, विवस्त्र करत मारहाण; व्हिडिओ काढून दिली जीवे मारण्याची धमकी

Pune Crime: पुणे हादरले! आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण, विवस्त्र करत मारहाण; व्हिडिओ काढून दिली जीवे मारण्याची धमकी

Pune Crime: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका ३१ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची अत्यंत अमानुष घटना उघडकीस आली आहे. केवळ मारहाणच नाही, तर या कृत्याचा व्हिडीओ बनवून पीडिताला ब्लॅकमेल करण्याचा आणि त्याच्यावर गोळीबार करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण कोंढवा परिसरात राहतो आणि वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा काही ओळखीच्या व्यक्तींसोबत आर्थिक कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा सूड घेण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री आरोपींनी त्याला कारमधून जबरदस्तीने उचलले आणि त्याचे अपहरण केले.

हेही वाचा – Dinanath Hospital : पुण्यातील प्रतिष्ठित ‘दीनानाथ’ रुग्णालयाला मोठा दणका; उषा मंगेशकरांसह 11 विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला, तुरुंगवासाची शक्यता

मैदानात नेऊन अमानुष अत्याचार

आरोपींनी तरुणाला गोकुळनगर परिसरातील एका निर्जन मैदानात नेले. तिथे त्याला विवस्त्र करून लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे झोडपून काढले. या संतापजनक कृत्याचा आरोपींनी मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

पिस्तुलाचा धाक आणि गोळीबार

या गुंडांचा हैदोस एवढ्यावरच थांबला नाही. संशयित आरोपी मंगेश माने याने कारमधील पिस्तूल काढून तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार केल्यास परिणाम वाईट होतील, असे धमकावत आरोपींनी तरुणाच्या दिशेने गोळीबारही केल्याचा आरोप आहे.

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या भयंकर अनुभवानंतर पीडित तरुणाने हिंमत एकवटून येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने कौशल ऊर्फ ऋषी मोरे यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!