Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांना दिलासा! तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत महामार्गांना मंजुरी; महिन्याभरात कामाला सुरुवात

पुणेकरांना दिलासा! तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत महामार्गांना मंजुरी; महिन्याभरात कामाला सुरुवात

Pune Highway : पुणे शहर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) पुणे जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली असून, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे दोन्ही महामार्ग लवकरच प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यात जाणार आहेत.

या दोन्ही रस्ते प्रकल्पांचे कंत्राट मोंटेकार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून, मंजुरी मिळताच महिन्याभरात काम सुरू करण्याचे नियोजन MSIDCकडून करण्यात आले आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D च्या दुरुस्ती व उन्नतीकरणाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. एकूण 53.20 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यापैकी 24.20 किलोमीटरचा भाग उन्नत असेल, तर उर्वरित मार्ग जमिनीच्या पातळीवर असेल.

त्याचबरोबर हडपसर-यवत मार्गावर सहा पदरी उन्नत महामार्ग उभारण्यात येणार असून, सध्याच्या रस्त्याचेही सहापदरीकरण केले जाणार आहे. यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि औद्योगिक परिसरातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!