Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dahisar: दहिसरमध्ये प्रचारादरम्यान राडा! घरात येण्यास विरोध केल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना बेदम मारहाण

Dahisar: दहिसरमध्ये प्रचारादरम्यान राडा! घरात येण्यास विरोध केल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना बेदम मारहाण

Dahisar Crime News: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दहिसरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारादरम्यान, घरात प्रवेश करण्यास मज्जाव केल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना लाथा-बुक्क्यांनी आणि पक्षाच्या झेंड्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

दहिसर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १ मधील विठ्ठलवाडी सोसायटी परिसरात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. शिंदे गटाची प्रचार फेरी सुरू असताना ८ ते १० कार्यकर्ते एका घरात मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिरत होते. मात्र, संबंधित घरमालकाने घरात येण्यास आणि प्रचार करण्यास विरोध दर्शवला. या किरकोळ कारणावरून कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी घरात शिरून दोन व्यक्तींवर हल्ला चढवला.

हेही वाचा – Mumbai BMC Election : मुंबईसाठी शिंदेसेनेचा स्वतंत्र वचननामा; महिला आरोग्य, प्रदूषणमुक्ती ते भुयारी रस्ते; ‘या’ घोषणा ठरणार गेमचेंजर

झेंड्यांच्या काठ्यांनीही प्रहार

प्रचारासाठी हातात घेतलेल्या पक्षाच्या झेंड्यांचा वापर कार्यकर्त्यांनी मारहाणीसाठी केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते आक्रमक होऊन नागरिकांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. या गुंडगिरीमुळे दहिसर परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला असून सामान्य मतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडितांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठले. एम.एच.बी. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मध्यरात्रीच ८ ते १० अज्ञात कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या या आरोपींची धरपकड सुरू आहे.

नागरिकांचा संतप्त सवाल

निवडणूक जिंकण्याआधीच जर कार्यकर्त्यांची ही दादागिरी असेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर हे काय करतील? असा संतप्त सवाल दहिसरमधील स्थानिक नागरिक विचारत आहेत. ऐन मतदानाच्या तोंडावर घडलेल्या या हिंसक घटनेमुळे उमेदवाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!