Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thackeray Brothers Joint Interview: ‘भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलूच नये…’; राज ठाकरेंची घणाघाती टीका, संयुक्त मुलाखतीचा प्रोमो व्हायरल

Thackeray Brothers Joint Interview: ‘भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलूच नये…’; राज ठाकरेंची घणाघाती टीका, संयुक्त मुलाखतीचा प्रोमो व्हायरल

Thackeray Brothers Joint Interview: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर पुन्हा एकदा ‘ठाकरे’ नावाचे दोन दिग्गज एकाच चौकटीत पाहायला मिळत आहेत. शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील नव्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली ऐतिहासिक संयुक्त मुलाखत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मुलाखतीचा १ मिनिट ४० सेकंदांचा वादळी टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवून दिली आहे.

संजय राऊत आणि महेश मांजरेकरांची ‘जुगलबंदी’

या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे बंधूंना बोलते करण्यासाठी खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर एकत्र आले आहेत. टीझरची सुरुवातच “महाराष्ट्राला हे चित्र पाहण्यासाठी २० वर्षे वाट का पाहावी लागली?” या राऊतांच्या बोचऱ्या प्रश्नाने होते. ठाकरे बंधूंच्या विभाजनापासून ते पुन्हा एकत्र येण्यापर्यंतचा प्रवास या चर्चेचा केंद्रबिंदू असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? अजित पवारांच्या सूचक वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

सत्तेच्या मानसिकतेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार

मुलाखतीत उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक रूपात दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना ते म्हणतात, “राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर नाही.” या एका विधानातून त्यांनी सत्तेसाठी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेवर आणि सत्ता समीकरणांवर त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. “भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर फडणवीसांनी काही बोलूच नये,” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिक अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “करप्शन आणि कन्फ्यूजनची युती” या भाजपच्या टीकेला ठाकरे बंधू या मुलाखतीत सडेतोड उत्तर देणार असल्याचे दिसत आहे.

मुंबईच्या भवितव्याबाबत गंभीर आरोप

या चर्चेत मुंबईचा मुद्दा सर्वाधिक गाजण्याची शक्यता आहे. “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान रचले जात आहे,” असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच, मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि बकालपणावर महेश मांजरेकर यांनी ‘एक मुंबईकर’ म्हणून खंत व्यक्त केली. त्यावर भाष्य करताना राज यांनी इशारा दिला की, “मुंबई तर खराब झालीच आहे, पण आता पुण्याचाही विनाश लवकरच होईल.”

मुलाखत कधी प्रसिद्ध होणार ?

मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत अत्यंत निर्णायक मानली जात आहे. ‘ठाकरे ब्रँड’ एकत्र आल्यानंतर आता राजकीय समीकरणे कशी बदलणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही मुलाखत ८ आणि ९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीमुळे महायुती विरुद्ध ठाकरे युती असा सामना अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!