Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; एकनाथ शिंदेंनी एकाच दिवशी ३ बडे नेते फोडले

Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; एकनाथ शिंदेंनी एकाच दिवशी ३ बडे नेते फोडले

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार नितीन भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यासोबतच नाशिकमधील आणखी दोन बड्या नेत्यांनीही भाजपची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तिकीट नाकारल्याने नितीन भोसले नाराज

महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळेल, या अपेक्षेने नितीन भोसले यांनी २५ डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ऐनवेळी भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्याने ते नाराज झाले होते. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. अवघ्या दहा दिवसांत पक्ष बदलल्यामुळे नाशिकच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नितीन भोसले हे यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिले आहेत. भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाला धक्का बसला होता; मात्र आता भाजपलाच मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

दोन माजी महापौरही शिंदे गटात

नितीन भोसले यांच्यासोबतच माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनीही मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकाच दिवशी भाजपचे तीन बडे नेते पक्ष सोडून गेल्यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

दशरथ पाटील हे २००३-०४ च्या कुंभमेळ्यावेळी नाशिकचे महापौर होते, तर २०१५-१६ च्या कुंभमेळ्यावेळी अशोक मुर्तडक महापौरपदावर होते. या दोघांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची नाशिकमधील ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

भाजपसाठी मोठा धक्का

महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपचे तीन वजनदार नेते शिंदे गटात गेल्याने नाशिकमध्ये भाजपची रणनीती अडचणीत आली आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला मोठे बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!