Today सोमवार, 31st ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jain Community Morcha: मुंबईत जैन समाजाचा 7 डिसेंबरला ‘जीव दया कबुतर बचाव’ मोर्चा; निलेशचंद्र विजय महाराज करणार मोर्चाचे नेतृत्व

Jain Community Morcha: मुंबईत जैन समाजाचा 7 डिसेंबरला ‘जीव दया कबुतर बचाव’ मोर्चा; निलेशचंद्र विजय महाराज करणार मोर्चाचे नेतृत्व

Jain Community Morcha: जैन समाजाने ‘जीव दया आणि कबुतर बचाव’ या मोहिमेला बळ देण्यासाठी येत्या 7 डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलनात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात कुलाबा जैन मंदिरातून होणार असून लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ अशा प्रमुख ठिकाणांमधून जात तो दादर कबुतरखाना आणि इतर मुख्य जैन मंदिरांपर्यंत पोहोचणार आहे.

समाजात जनजागृतीसाठी प्रवचन व कार्यक्रमांची आखणी

या यात्रेदरम्यान समाजातील लोकांना मोहीमेची माहिती देण्यासाठी प्रवचन, संवाद-सत्रे आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळावा यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहनही केले जाणार आहे. विशेष म्हणजे, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निलेशचंद्र महाराज दादरमध्ये पुन्हा अनशन करण्याची तयारी करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Dadar Kabutarkhana : डॉक्टर मूर्ख, एक-दोन जण मेल्यानं काय होतं?; जैन धर्मसभेत कैवल्य रत्न महाराज बरळले

समाजाला तोडणाऱ्यांना सोडणार नाही – निलेशचंद्र महाराज

एबीपी माझाच्या ‘महाकट्टा’ कार्यक्रमात सहभागी होताना निलेशचंद्र विजय महाराजांनी मंदिर पाडकाम, समाजावरील अन्याय आणि राजकीय दुटप्पीपणावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जैन धर्म हजारो वर्षांचा आहे; आमच्या समाजाने कधीच इतरांचे मंदिर किंवा घरे तोडून जैनालय उभारले नाही. आम्ही शांतिप्रिय आहोत. पण विलेपार्लेतील आमचे मंदिर बुलडोझरने पाडले गेले. मग अवैध मशिदींवर कारवाई का झाली नाही? जे समाजात फूट पाडतात, ते कोणाचेही असोत, त्यांना आम्ही सोडणार नाही. महाराजांनी पुढे सांगितले की काही नेत्यांनी तडजोडीचे आश्वासन दिले, परंतु त्यातून कोणताच निकाल निघाला नाही. माझे प्राण गेले तरी चालतील, पण समाजाला न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही.

जैन समाजाची स्वतःची पार्टी का नसावी?

आगामी निवडणुकांमध्ये राजकीय सहभागाबाबत विचारले असता निलेशचंद्र महाराजांनी स्पष्ट संकेत दिले की जैन समाजाने आपली स्वतंत्र राजकीय शक्ती उभारण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले, प्रत्येक समाजाची स्वतःची राजकीय ताकद आहे, मग जैन समाजाची का नसावी? अनेकदा आमच्या प्रश्नांसाठी आम्हाला वेगवेगळ्या दरवाज्यांवर जावे लागते. आम्ही शांत, गैरविवादित समाज आहोत, पण अन्याय झाल्यास आमच्यासाठीही आवाज उठवावाच लागतो.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!