Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalna Corruption: जालना हादरलं! अतिवृष्टी अनुदानावर डल्ला मारणारे 4 तलाठी अटकेत; 25 कोटींच्या महाघोटाळ्याने उडाली प्रशासनाची झोप

Jalna Corruption: जालना हादरलं! अतिवृष्टी अनुदानावर डल्ला मारणारे 4 तलाठी अटकेत; 25 कोटींच्या महाघोटाळ्याने उडाली प्रशासनाची झोप

Jalna Corruption: अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आलेले कोट्यवधींचे अनुदान हडपणाऱ्या भ्रष्ट साखळीवर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात गाजलेल्या २४ कोटी ९० लाख रुपयांच्या अनुदान गैरव्यवहार प्रकरणात फरार असलेल्या आणखी चार तलाठ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत २४ आरोपी गजाआड

या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासून आतापर्यंत एकूण २४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी अटक केलेल्या चार तलाठ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. विनोद जयजयराम ठाकरे (वय ४३) २. कृष्णा दत्ता मुजगुले (वय ३५) ३. गणेश ऋषींदर मिसाळ (वय ३४) ४. दिगंबर गंगाराम कुरेवाड (वय ५५) या चौघांनाही न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा – महसूल विभागात खळबळ! शिरूरमध्ये 7 हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

नेमका घोटाळा काय आहे?

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने निधी मंजूर केला होता. मात्र, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील २४० गावांमध्ये या निधीची मोठी लूट झाली. पात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली बनावट याद्या तयार करून अनुदानाची रक्कम परस्पर लाटण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने या महाघोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

न्यायालयाने जामीन फेटाळला अन् पोलिसांची कारवाई सुरू झाली

या प्रकरणातील १८ संशयितांनी अटकेपासून वाचण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच आर्थिक गुन्हे शाखेने आपली चक्रे वेगाने फिरवली. जे संशयित अद्यापही फरार आहेत, त्यांच्या विरोधात आता कठोर कायदेशीर पावले उचलण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. या घोटाळ्यात केवळ तलाठीच नव्हे, तर महसूल विभागातील काही बडे अधिकारी आणि त्यांचे एजंटदेखील सामील असल्याची चर्चा आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!