Today शुक्रवार, 12th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कळंबच्या किनारी वाहून आला अज्ञात कंटेनर; ग्रामस्थ भयभीत

कळंबच्या किनारी वाहून आला अज्ञात कंटेनर; ग्रामस्थ भयभीत

वसई : अज्ञात कंटेनर कळंबच्या समुद्रकिनारी वाहून आल्याचे दिसल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून हा कंटेनर मालवाहू जहाजातून पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वसईच्या कळंब या प्रचंड गर्दी असलेल्या सागरी किनाऱ्यावर मंगळवारी सकाळी एक भला मोठा लोखंडी कंटेनर दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि कोस्टल विभागाने कळंबच्या किनारी धाव घेऊन कंटेनरची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्राला भरती असल्यामुळे त्यांना वाट पाहावी लागली. भरती ओसरल्यावर कंटेनरला बाहेर आणून त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतरच त्याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी याच किनारी मेन कियाट नावाचे भले मोठे जहाज भरकटत वाहून आले होते. या जहाजात टीव्ही, फ्रीज अशा महागड्या वस्तू असलेली तीन मजली इमारत होती. ते स्क्रॅप करण्यासाठी गुजरातला नेत असताना भरकटत कळंबच्या किनारी लागले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटाच्या आणि समुद्रामार्गे अतिरेकी भारतात येण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे या कंटेनरच्या घटनेने येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!