सासवड : सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भिवडीजवळ टँकर -मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात युवक-युवतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २२) दुपारी बाराच्या सुमारास घडली. युवक नंदू रत्नाकर होले (वय २३, रा. खानवडी) आणि युवती अपूर्वा रवींद्र कुंभारकर (वय २३, रा. कुंभारवळण, दोघे रा. कुंभारवळण) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
टँकरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


