Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीड हादरलं..! मित्राच्या शिवीगाळचा राग अनावर; चाकू छातीत अडकला अन् मूठ बाहेर, नेमकं काय घडलं?

बीड हादरलं..! मित्राच्या शिवीगाळचा राग अनावर; चाकू छातीत अडकला अन् मूठ बाहेर, नेमकं काय घडलं?

Beed Crime News : बीड शहरात मंगळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक खुनाची घटना घडली. पाच मित्रांच्या भांडणातून विजय सुनील काळे (वय २७, रा. धारूर, स्वराज्य नगर, बीड) याचा खून झाला. आरोपी अभिषेक राम गायकवाड (वय ३०, रा. बीड) याने रागाच्या भरात विजयच्या छातीत चाकू खुपसला, जो आरपार गेला आणि मूठ तुटून बाहेर पडली. घटनेनंतर अभिषेक पाटोदा तालुक्यातील डोंगरात लपला, पण बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली.

नेमकं काय घडलं?

पाच मित्र एकत्र फिरत होते. काहींनी दारू प्यायली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरकोळ वाद झाल्यानंतर सर्वजण महाराणा प्रताप चौकात गेले. तिथे विजयने अभिषेकला शिवीगाळ केली आणि त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. याचा राग अनावर झाल्याने अभिषेकने दुचाकीला अडकवलेला चाकू काढून विजयच्या डाव्या छातीत खुपसला. विजय खाली कोसळला आणि मित्रांनी त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, रक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिसांनी सुनील काळे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला सापळा रचून अटक

खुनानंतर अभिषेकने मित्राची दुचाकी घेऊन पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील आत्याच्या गावी मुक्काम केला. दुचाकी लपवून तो सकाळी डोंगरात लपला. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चाकू आणि तुटलेली मूठ पोलिसांनी जप्त केली आहे.

विजय आणि सनी आठवले कनेक्शन

मयत विजय काळे हा कुख्यात गुन्हेगार सनी आठवलेचा समर्थक होता. त्याने छातीवर सनीचा फोटो गोंदवला होता. खुनापूर्वी विजयचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे या घटनेला वेगळीच चर्चा मिळाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!