Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

“शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का?” संजय राऊतांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

“शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का?” संजय राऊतांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. यामध्ये पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय समाविष्ट आहे.

मात्र, या सरकारी जीआरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. भुजबळांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देत बुधवारी (३ सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर जोरदार टीका करत त्यांना डिवचले आहे.

राऊतांचा भुजबळांवर निशाणा

संजय राऊत यांनी भुजबळांना उद्देशून सवाल उपस्थित केला, “तुम्ही शिवसेना जातीपातीचे राजकारण करते म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या काळात पक्ष सोडला होता. आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तुम्हाला ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे वाटत असेल, तर मंत्रिमंडळातून राजीनामा देणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी नेते असल्याचे सांगतात, आणि त्यांच्या कृपेमुळेच तुम्ही मंत्रिमंडळात आहात. मग आता तुम्ही काय करणार?” राऊतांनी भुजबळांच्या नाराजीला “नाटक” संबोधत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भुजबळ नाराज आहेत की नाही, हा मुद्दा नाही. ते मंत्रिमंडळात का आहेत? जर समाजावर अन्याय होत असल्याचे वाटत असेल, तर राजीनामा द्या,” असे राऊतांनी ठणकावले.

मराठा आरक्षण आणि भुजबळांचा विरोध

मराठा आरक्षणाला ओबीसी प्रवर्गातून लाभ देण्याच्या सरकारच्या निर्णयाला भुजबळांनी “ओबीसी आरक्षणाला धक्का” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि विविध आयोगांच्या निष्कर्षांचा दाखला देत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे सांगितले आणि त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. भुजबळांनी जीआरविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली असून, ओबीसी समाजाच्या रक्षणासाठी लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

राज ठाकरे-फडणवीस भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या घडामोडींमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर राऊत म्हणाले, “वर्षावरील गणपती हा मुख्यमंत्र्यांचा परंपरागत गणपती आहे. राज ठाकरे गणेशभक्त आहेत. फडणवीसांनी आमंत्रण दिले असेल, तर त्यात हरकत नाही.” राऊतांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!