Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पाचोड-पैठण रस्त्यावर बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटलं; 25 लाखांची रोकड लंपास करून काढला पळ

पाचोड-पैठण रस्त्यावर बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटलं; 25 लाखांची रोकड लंपास करून काढला पळ

Paithan Robbery: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी दरोड्याने परिसरात खळबळ उडवली आहे. पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रोख रक्कम घेऊन दावरवाडी शाखेकडे निघालेल्या कर्मचाऱ्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करत तब्बल २५ लाखांची रोकड पळवली. शनिवारी, सकाळी ११ च्या सुमारास पाचोड–पैठण मार्गावर ही घटना घडली.

रोख रक्कम हिसकावण्यासाठी कट मारून हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे वरिष्ठ कर्मचारी गणेश आनंद पहीलवान (६५) हे स्कुटीवरून दावरवाडी शाखेकडे येत होते. पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या स्कुटीला जोरदार कट मारून त्यांचा तोल जाऊ दिला आणि त्यानंतर हातातील दगडाने स्कुटीवर वार केले. गोंधळाच्या क्षणी आरोपींनी पहीलवान यांच्याकडे असलेली २५ लाखांची बॅग हिसकावून घेतली आणि पळ काढला.

हेही वाचा – Pune Cyber Crime: सायबर चोरीची आणखी एक घटना; सीबीआय कारवाईची भीती दाखवून जेष्ठ महिलेची 1 कोटी 19 लाखांची फसवणू

धक्क्यातून सावरताच पहीलवान यांनी त्वरित शाखा अधिकाऱ्यांना फोनवर माहिती दिली आणि चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र आरोपी दुचाकीवरून प्रचंड वेगात पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनेही घटनास्थळाची पाहणी करीत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. दरम्यान, या प्रकरणी पाचोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

अलिकडच्या काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनेक गंभीर प्रकरणांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये रोष असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्थानिकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलण्याची, तसेच परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!