Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडकुंडीला आणलं…’; भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर

‘मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडकुंडीला आणलं…’; भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर

जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘अशिक्षित’ टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना म्हटले, ‘मी जरी अशिक्षित असलो तरी तुम्हाला रडकुंडीला आणले. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नव्हते, पण त्या विचारांवर मी पाणी फिरवले. मी अशिक्षित असतानाही जर तुम्हाला रडकुंडीला आणले, तर आमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले तर त्याचा परिणाम काय होईल, याचा विचार करा. भुजबळांना हे माहीत आहे की मी अशिक्षित आहे की सुशिक्षित, पण त्यांना सुधारता येत नाही.’

दरम्यान, यावेळी जरांगे पाटीलने मराठा आमदार आणि खासदारांना स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मराठ्यांच्या सर्व नेत्यांनी ठामपणे सांगावे की आम्हाला 10 टक्के SEBC आरक्षण हवे, पण ते 50 टक्क्यांच्या आत OBC आरक्षणात असावे. तथापी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे म्हणाले की, ‘मी प्रकाश आंबेडकर यांचा आदर करतो, पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज म्हणून जातीय भेदभाव टाळला पाहिजे. सल्ला दिला तर तो ऐकावा, पण कोणत्याही जातीविरोधात संदेश जाऊ नये.’

तथापी, ओबीसी समाजातील तरुणाच्या आत्महत्येवर बोलताना जरांगे भावूक झाले. मराठा असो की OBC, कोणत्याही गरीब लेकराने आत्महत्या करू नये. राजकीय नेते अशा घटनांवर लगेच राजकारण करतात. आम्ही त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, पण लोकांच्या जीवनावर राजकारण करू नये, असं भावनिक आवाहनही यावेळी जरांगे पाटील यांनी केलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!