Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘धनूभाऊ तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता, पण…’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

‘धनूभाऊ तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता, पण…’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Ratnakar Gutte On Dhananjay Munde: अजित पवार गटाचे नेते आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेला खळबळजनक खुलासा नव्या राजकीय वादळाला कारणीभूत ठरत आहे. गुट्टे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेत बोलताना दावा केला की, “इंदूरमधील एका हॉटेलमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता होती. पण आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराजांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना वाचवले.” तसेच मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याची माहिती स्वतःकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र ती माहिती उघड न करता, ‘तुमचा निकाल लावल्याशिवाय मी थांबणार नाही, असा थेट इशारा गुट्टेंनी दिला. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – ‘धनंजय मुंडे इतका नीच माणूस…’; वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर धनंजय मुंडेंवर जरांगेंचा निशाणा

गुट्टेंनी पुढे आरोप केला की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, विविध उमेदवारांना उभे केले आणि मोठी ताकद लावली. मात्र मतदारांच्या पाठिंब्यामुळेच आपण मोठ्या मताधिक्याने विजयी झालो, असे ते म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये सभा घेऊन रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली होती. त्यांनी गुट्टेंवर शेतकऱ्यांच्या नावावर 1600 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप करून त्यांची तुलना नीरव मोदींशी केली होती. या आरोपांना उत्तर देताना गुट्टेंनी अधिक आक्रमक सूर लावत मुंडेंना प्रत्युत्तर दिले.

तुम्ही मला नीरव मोदी म्हणता, पण प्रत्यक्षात विजय मल्ल्याचे छंद आणि तुमचे छंद एकसारखे आहेत, असा टोला गुट्टेंनी लगावला. त्याचबरोबर, मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ शकतो. पण धनुभाऊ, तुमचा हिशेब न करता मी शांत बसणार नाही, असे वक्तव्य करून त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!