Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Local Body Election : मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निकालाची नवी तारीख काय?

Local Body Election : मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निकालाची नवी तारीख काय?

Local Body Election : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाने आज (२ डिसेंबर २०२५) महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, उद्याची (३ डिसेंबर) मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. राज्यात आज (२ डिसेंबर) २४२ नगरपरिषद व ४६ नगरपंचायतींमध्ये मतदान पार पडले असले तरी, काही ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे २० डिसेंबरला प्रलंबित असलेल्या २० हून अधिक निवडणुकांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात येईल.

यामुळे सर्व उमेदवारांचे भवितव्य २१ डिसेंबरला स्पष्ट होईल. हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक निवडणुका पूर्ण करण्याच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादावर सुनावणी घेतल्यानंतर असा निर्णय दिला. याचिकेत म्हटले होते की, आज झालेल्या मतदानाचा निकाल आधी जाहीर केल्यास प्रलंबित निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्या निवडणुकांना न्याय मिळणार नाही.

न्यायालयाने हे मत मान्य करत सर्व निकाल २१ डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करण्याचे आदेश दिले. तसेच, एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई केली असून, आदर्श आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत कायम राहील. पुढील सुनावणी १० डिसेंबरला होईल, तर राज्य निवडणूक आयोग व शासनाला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे सांगितले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!