Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गौरी पालवे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! गौरीच्या वडिलांकडून ‘या’ दोन व्यक्तींच्या अटकेची मागणी

गौरी पालवे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! गौरीच्या वडिलांकडून ‘या’ दोन व्यक्तींच्या अटकेची मागणी

Gauri Palve Death Case: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएपदावर कार्यरत असलेले अनंत गर्जे यांना वरळी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी शनिवारी रात्री राहत्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली. गौरी यांच्या आई-वडिलांनी आत्महत्येच्या दाव्याला पूर्णपणे नकार देत, यामागे घातपात असल्याची जोरदार शंका व्यक्त केली आहे. गौरी पालवे यांच्या वडिलांनी वरळी पोलिसांना दिलेल्या पत्रात आणखी गंभीर आरोप करत, फक्त अनंत गर्जेच नव्हे तर त्यांची बहीण आणि भाऊ यांनाही अटक करावी, अशी मागणी केली आहे. गौरीच्या मृत्यूला हेच तिघे जबाबदार आहेत, असं पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी

पालवे कुटुंबियांनी घटनेच्या दिवशीचे बिल्डिंगमधील जिना, लिफ्ट आणि मुख्य प्रवेशद्वाराचा सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करण्याची मागणी केली आहे. गौरी कशा परिस्थितीत मृत अवस्थेत आढळली याचा खरा मागोवा फुटेजमधून लागू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

दहाच महिन्यांच्या संसाराचा दुर्दैवी अंत

गौरी आणि अनंत यांचं लग्न फेब्रुवारीमध्ये मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नाला स्वतः पंकजा मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली होती. अवघ्या दहा महिन्यांतच गौरी यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंब, नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – ‘गौरीच्या घरच्यांना अनंतच्या जुन्या संबंधांविषयी…’; अनंत गर्जेच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा

लग्नापूर्वी प्रेमसंबंधांची माहिती दिल्याचा दावा

गर्जेच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहिलेल्या वकिलाने मोठा दावा करत सांगितलं की, अनंत गर्जे यांच्या कथित प्रेमसंबंधाबाबत गौरीच्या कुटुंबाला लग्नापूर्वीच माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठोस नसल्याचे त्यांनी सांगितले. गौरी पालवे यांच्या वडिलांनी उल्लेख केलेली कागदपत्रे लातूर येथील एका रुग्णालयात असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.

२७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अनंत गर्जेचे वकील कोठडीला विरोध करत असतानाही, न्यायालयाने प्राथमिक तपासात अधिक माहिती आवश्यक असल्याचे नमूद करून गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांनी गर्जेच्या वरळीतील घरात झाडाझडती देखील घेतली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!