Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक..! व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली ठेऊन नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

धक्कादायक..! व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली ठेऊन नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

परभणी : गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने स्वतःच्या पत्नीवर धारदार हत्याराने 10 ते 12 वार करत तिचा निर्घृण खून केला. विशेष म्हणजे, या हत्येपूर्वी आरोपी पतीने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेलं स्टेटस ठेवलं होतं. यामुळे संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

जिंतूर तालुक्यातील वाघी गावचा विजय राठोड याचा विवाह सोनपूर तांडा येथील विद्या राठोड यांच्याशी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये सतत वाद सुरू होते. या भांडणांमुळे विद्या माहेरी राहायला गेली होती. घटनेच्या दिवशी विद्या तिच्या वडिलांच्या शेतात काम करत असताना तिथे विजय राठोड याच्यासोबत पुन्हा शाब्दिक चकमक झाली.

या वादाने टोक गाठलं आणि संतापलेल्या विजयने हातातील धारदार हत्याराने विद्याच्या छाती, पोट आणि पाठीवर 10 ते 12 वार केले. या हल्ल्यात विद्या गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं.

नातेवाईकांचा आक्रोश, संतप्त जमावाची मागणी

या घटनेनंतर रुग्णालय परिसरात विद्याच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. भर पावसातही संतप्त जमावाने आरोपी विजय राठोड याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव टाकत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

व्हॉट्सअप स्टेटसने उडाली खळबळ

या हत्याकांडाची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, विजय राठोडने खून करण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेलं स्टेटस ठेवलं होतं. या कृतीमुळे हत्येचा हेतू आणि त्यामागील कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विजयने इतक्या क्रूरपणे विद्याचा खून का केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून, तपासातून यामागील नेमकं कारण आणि परिस्थिती उघड होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!